डोळ्याच्या पडद्याचे ऑपरेशन

By Dr. Sourabh Patwardhan
Total Views : 8482

बरोबर चार वर्षांपूर्वी या मावशी आपल्या शेजाऱ्यांना घेऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये आल्या. कारण अचानक दिसायचे बंद झाले होते. एक डोळा आधीच पडदा सरकल्याने निकामी होता. आता दुसऱ्या डोळ्यात सुद्धा अचानक पडदा सरकला होता. लगेच ऑपरेशन लागणार आहे याची कल्पना दिली. आधीच एकट्या आणि बरोबर शेजारी आलेले. त्यांना म्हटले की इथेच थांबा, फिटनेस करून ऑपरेशन करू, पैसे नंतर बघू. अचानक दिसायचे बंद होणे म्हणजे किती भीतीदायक असते याची कल्पनाच केलेली बरी...
संध्याकाळीच ऑपरेशन केले ..पडद्याचे ऑपरेशन तसे जटिल.. यशाची खात्री नसते. पण मस्त झाले. मावशींना दिसायला लागले ... आज चार वर्षांनी checkup ला आल्या त्याही कोकणातून एकट्या ... खरे सांगू भरून आले .. अभिमान वाटला आपले ज्ञान आपले कष्ट कोणाच्या तरी आयुष्यात सुख देऊन गेले ... ज्या modern मेडिसिन च्या संशोधकांनी असे पडद्याचे उपचार शोधले आणि ज्यांनी ते मला शिकवले त्यांचे मनापासून आभार
ऑपरेशनचा दिवस अजून आठवतो कारण तेव्हाच माझ्या लहान मुलीचा जन्म झाला
अशीच दृष्टी तुम्हाला आयुष्यभर लाभो हीच प्रार्थना

Photos :

डोळ्याच्या पडद्याचे ऑपरेशन