डोळ्याच्या पडद्याचे ऑपरेशन

By Dr. Sourabh Patwardhan
Total Views : 1943

साधारण सहा महिन्यापूर्वीची गोष्ट ...या आजींना घेऊन त्यांचा नातू आला..त्यापूर्वी सहा महिन्यांपासून त्यांची दृष्टी पूर्ण गेली होती..डावा डोळा तर पूर्वीपासून काम करीत नव्हता आणि उजव्या डोळ्यात क्वचित कधीतरी प्रकाश दिसायचा. तपासणी मध्ये आढळून आले की पडद्याला सूज येण्याचा एक दुर्धर आजार त्यांना होता ..त्याला बऱ्याचवेळा स्ट्रॉंग औषधे द्यावी लागतात तरी काही वेळा तो वाढत जातो.. डोळ्याचे प्रेशर कमी झालेले होते ..म्हणजेच डोळा हळूहळू निकामी होत होता ..अश्या स्थितीत ऑपरेशनचा एक पर्याय असतो पण त्याचा उपयोग होतोच असे नाही.. पण एक तरी प्रयत्न करावा असा माझा सल्ला होता अर्थात त्याचा उपयोग होईलच असे नाही याची कल्पना आजींना आणि नातेवाईकांना होती ..६ महिन्यापूर्वी त्यांचे पडद्याचे ऑपरेशन मी केले... ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी थोडा उजेड आजींना दिसत होता
आता सहा महिन्यांनी आल्या तेव्हा त्यांना रंग आणि विविध वस्तू दिसू लागल्या ...मला पाहून म्हणाल्या "डॉक्टर पहिल्यांदा पाहिले बघा तुम्हाला" आणि ती फोटो काढणारी मुलगी सुद्धा दिसतीय बघा पांढरा कोट घालून
त्यावेळी सर्वांना जो आनंद झाला तोच आत्मिक आनंद
तो अनुभवावा लागतो

Photos :

डोळ्याच्या पडद्याचे ऑपरेशन